खुलताबाद, (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूर लंबी - राजूर गांगदेव दुचाकींची न तीन जणारी सकाळी त घडला. वय ६०), (वय ६०, फुलंब्री) ४६, रा. वे आहेत. ७ आणि मांकाच्या गांगदेव ब्ली. येथून देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या युवकांच्या दुचाकीला राजे छत्रपती संभाजी साखर कारखान्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली.
या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अक्षय बिजलसिंग राजपूत, अमोल अशोक औटे आणि गोरख म्हसकर या तिन्ही युवकांवर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे जाफरवाडी आणि गोळेगाव गावांवर शोककळा पसरली आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त देवीची ज्योत आणण्यासाठी जाफरवाडी येथील अक्षय राजपूत, गोळेगाव येथील अमोल औटे व गोरख म्हसकर आणि परिसरातील आणखी एक युवक कोल्हापूरला गेले होते. ज्योत घेऊन परतत असताना राजे छत्रपती संभाजी साखर कारखान्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
या अपघातात अक्षय राजपूत याचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल औटे आणि गोरख म्हसकर यांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी तिन्ही युवकांचे मृतदेह त्यांच्या गावी आणण्यात आले. गोळेगाव येथे अमोल औटे औटे आणि गोरख म्हसकर, तर जाफरवाडी येथे अक्षय राजपूत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला.















